मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाटील हे आडनाव आपण सगळीकडे पाहतो तर मग नेमके ह्या आडनावाची सुरुवात कशी झाली हे माहीत आहे का ?

खरं तर पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला.आधी गावचा कारभार पाहिण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक करण्यात यायची तो वतनदार नेमणूक झाल्यांनतर  तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा) वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर ठिकाणावर  नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी हि  पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे सर्व  गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेत असे   एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती आणि मग त्यातूनच ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला.  तर कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे पाटलाचे  काम अजून  वाढल्याने पाटलाची दोन पदे आली ते खालील प्रमाणे.  १) पोलिस पाटील  २) मुलकी पाटील.  गावातील लग्नसमारंभ असो की कुठला कार्यक्रम वा कुठलाही सण पाटलाचा मान हा पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिका