मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परंडा किल्ल्याचा इतिहास

परंडा किल्ला परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला आहे आणि शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परंडा हा एक महत्वाचा परगणा होता.बहामनी राजवटी मध्ये महमूद गवान याने तो बांधला.उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि परंडा मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती... आयताकृती बांधकाम , दोन पदरी संरक्षक भिंत , चंचल , शहामटकल , महाकाल या सारख्या ५० फूट उंचीच्या २६ बुरुजांनी परंडा किल्ला सज्ज असून संपूर्ण किल्ल्याला बाहेरून रुंद असे खंदक खोदलेलं आहे.   उत्तरेकडील बुरुजा दरम्यान मुख्य प्रवेशद्वार रेखीव लाकडात असून त्यावर टोकदार दार खिळे बसविलेले आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर प्रत्यक्षपणे आजपर्यंत कोणीही आक्रमण केलेले नाही तरीही किल्ल्या मध्ये आजही असंख्य तोफा व त्याचे भव्य आकाराचे तोफ गोळे पाहिल्यानंतर हा काय प्रकार आहे हे लवकर लक्षात येत नाही कारण एवढी युद्धसामुग्री अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर सापडत नाही त्यामुळे

नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास

  नळदुर्ग नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यामधील सर्वात मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ 3 कि.मी लांब पसरलेली आहे.या तटबंदीत ११४ बुरुज आहेत् .महाराष्ट्राचे गिरीदुर्ग , जलदुर्गाबरोबरच अनेक महत्त्वाचे असे वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमधला महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. भोगोलिक स्थान नाव = नळदुर्ग प्रकार = भुईकोट ठिकाण = नळदुर्ग , ता-तुळजापूर जवळचे गाव = नळदुर्ग उंची = ० फुट कसे जाल ? नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर   नळदुर्ग किल्ला आहे. सोलापूरकडून हैद्राबादकडे निघाल्यावर सोलापूर पासुन ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे आणि ह्या गावातच नळदुर्ग किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला अप्रतिम बांध कामाचा अजोड किल्ला आहे. इतिहास स्थानिक गावातील लोक नळदुर्गा किल्ल्याचा   इतिहास नळ राजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहमनी सुलत

रतनगड किल्ल्याचा इतिहास

रतनगड रतनगड किल्ला (डोंगरी किल्ला ) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्हामध्ये आहे. भोगोलिक स्थान नाव = रतनगड प्रकार = गिरिदुर्ग ठिकाण = रतनवाडी ,  ता-अकोले जवळचे गाव = रतनवाडी उंची = ४३०० फुट समुद्रसपाटीपासुन उंची-३५२३फुट कसे जाल   ? गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले -राजुर-भंडारदरामार्गे जाता येते. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे ,  गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे १ – गणेश दरवाजा. २ – रत्ना देवीची गुहा. (मंदिर) ३ – मुक्कामाची गुहा. ४ – प्रमुख दरवाजा. (यावर देवादिकांची शिल्पे पहावयास मिळतात) ५ – इमारतींचे जोते. (गडावरील जुन्या भग्न इमारतींचे अवशेष    ) ६ – कडेलोट पॉइंट. ७ – राणीचा हुडा (भग्न बुरूज) ८ – प्रवरेचे उगमस्थान. ९ – मोर्च्याची ठिकाणे आणि बुरूज. १० – अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तले. (यातील पाणी हे अतिशय स्वछ असून पिण्यास योग्य आहे ) ११ – नेढ़ ( खडकाला असलेले आरपार भगदाड ,  गडावरील अत्युच्च ठिकाण ) १२ – कल्याण दरवाजा. (यालाच त्रिम्बक दरवाजा   , साम्रद किंवा कोकण असेही म्हणतात.) इतिहास

पेडगावचा बहादुरगड किल्ल्याचा इतिहास

बहादुरगड बहादुरगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. " पांडे पेडगावचा भुईकोट" हे ह्या किल्ल्याचे अधिकृत नाव आहे आणि gaztee मध्येही हीच नोंद आहे पण बहादुरगड हे या किल्ल्याचे सर्वीकडे प्रचलित नाव आहे . २५ मे २००८ ला संभाजीभक्तांनी व इतिहासप्रेमीनि या गडाचे धर्मवीरगड असे नामकरण केले आहे. भोगोलिक स्थान पेडगावचा किल्ला बहादुरगड म्हणून प्रसिद्ध आहे. बहादुरगड किल्ला हा   (आता धर्मवीरगड) अहमदनगर जिल्ह्या मधील श्रीगोंदे तालुक्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्यादक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिण सीमेवर भीमा नदी वहाते. भीमा नदीच्या उत्तरतीरावर धर्मवीरगड ( आधीचे नाव बहादुरगड ) किल्ला आहे. कसे जाल ? पेडगावच्या धर्मवीरगडला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. * दौंड हे पुणे जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव असून रस्त्यानी आणि रेल्वे गाडी ने   जोडले गेले आहे. दौंडकडून एका वाहनाने देऊळगाव पर्यंत येऊन पेडगाव गाठावे लागते. अलीकडील पेडगाव मधून नावेने पत्रीकडील पेडगावामधील धर्मवीरगडला जावे लागते. * दुसरा मार्ग म्हणजे पुण्यातून अथवा अहमदनगर कडून

अहमदनगरचा भुईकोट किल्ल्याचा इतिहास

अहमदनगरचा भुईकोट किल्ला भुईकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्हामध्ये आहे भोगोलिक स्थान अहमदनगर शहराच्या पुर्व दिशेला भुईकोट किल्ला आहे. सभोवताली तट बांधुन जमिनीवरच बांधलेला किल्ला म्हणजे भुईकोट. अजिंक्य किल्ल्यामध्ये अहमदनगरच्या  भुईकोट किल्ल्याचा समावेश होतो , संपुर्ण इतिहासात हा किल्ला कोणाला स्वबळावर जिंकता आला नाही. जिंकला तो फक्त वाटाघाटिने अथवा फंद-फितुरिनेच! १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात मोलाना आझाद , डॉ. पी.सीघोष , सरदार वल्लभभाई पटेल , पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. पंडित जवाहरलाल नेहरूनि डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ  याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते अजूनही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केल्रा. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरनि सुद्धा थॉट्स ऑफ पाकिस्तान आणि मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले होते . हवामान किल्ल्याचे नाव- भुईकोट किल्ला , भिंगारचा किल्ला , अहमदनगर किल

गवळीगड(गाविलगड) त्याचा इतिहास आणि कस जायचं चला बघू ?

गाविलगड गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. इ.स.वि सन १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी  हा बांधलेला वैभवशाली किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा एक वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला आहे आणि विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारच्या किल्ल्यामध्ये येतो आणि तो अमरावती जिल्ह्यामधील  चिखलदरा तालुक्यामध्ये आहे . हवामान पाऊस : १५५ से.मी. तापमान : हिवाळा - ५ से. ,  उन्हाळा : ३९ से. इतिहास महाभारतातल्या भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला होता व त्याला इथे बाजूच्या दरीत फेकून दिले असे कथेमद्यें आहे. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. कीचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर चिखलदरा आहे. इ.स. १८०३ मध्ये मराठे व इंग्रज या दोघांमध्ये मध्ये या किल्ल्यावर युद्ध झाले होते आणि तो या किल्यावरची  महत्त्वाची लढाई होती. ऑर्थर वेत्रस्त्रीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. हा किल्ला बहामणी सुलतान अहमद शाह यांनी 1425-26 मध्ये बांधला होता आणि हाभूभाग बहमनी सुलतानां