मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कन्हेरगड किल्ल्याचा इतिहास

कन्हेरगड कोठे आहे ? गौताळा - औट्रम घाट अभयारण्यात चाळीसगाव शहरापासून १८ कि. मी. अंतरावर असलेल्या पाटणादेवी या परिसरात आहे. उंची समुद्रसपाटीपासून ६६० मीटर. कसे जावे ? चाळीसगांव हे तालुक् याचे ठिकाण मध्य रेल्वेच्या मुंबई-नासिक रोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर येते. चाळीसगांव बसस्थानकावरून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व खाजगी वाहन हि पाटणादेवी पर्यंत असतात. अभयारण्याच्या प्रवेशदवारातून आत मध्ये शिरल्यावर दीड कि. मी. अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी दिसते. तिथे उजव्या हाताला मंदिराकडे जाणारी पायवाट आहे तिने ५ मिनिटांत मंदिरापर्यंत पोहचता येते. मंदिरापासून १० मिनिटांच्या अंतरावर गडाचा पायथा आहे. मंदिराच्या पाठीमागच्या रस्त्याने थोढे पुढे गेल्यावर येथून डोंगरावर जाणारी पायवाट दिसते तिने ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर एक आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे , जवळपास २ मिनिटांनी उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. त्यांनंतर ७-८ मिनिटांनी नागार्जुन लेणी जवळ आपण पोहचतो. इथे असलेया गुहेच्या वरच्या अंगाला पाण्याचा टाकं आहे तेथून १० मिनिटे अंतर कापतल्लरे

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास

प्रतापगड विदर्भामध्ये काही उल्लेखनिय किल्ले आहेत यातील काही डोंगरी किल्ले असून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत.विदर्भातील प्रतापगड हा सुद्धा एक वनदुर्ग आहे. भोगोलिक स्थान विदर्भामध्ये गोंदिया जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव हा तालुका आहे. गोंदिया रेल्वे मार्गानी जोडलेले आहे. गोंदिया-सडक अर्जुनी-अर्जुनी मोरगाव असा गाडी रस्ता आहे. हा गाडी रस्ता नवेगाव बांध या गावाजवळून जातो. नवेगाव बांध अभयारण्य प्रसिद्धच ओह. नवेगाव बांधपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोठणगावाकडे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. अर्जुनी मोरगाव कडूनही १६ कि.मी. अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगाव तिबेटी लोकाच्या वसाहतीमुळे या भागात प्रसिद्ध आहे. जाण्यासाठी मार्ग नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. ही रांग प्रतापगड किल्ल्याला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग हा पूर्वेकडून आहे. पूर्व पायथ्यापर्यंत गाडीमार्गाने पोहोचता येते. प्रतापगडाच्या पूर्व पायथ्याच्या पठारावर दर्गी आहे.दर्ग्यीजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे.दर्ग्याजवळच किल्ल्याच्या बांधकामाचे अ

सामानगड किल्ल्याचा इतिहास

सामानगड सामानगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बाधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी , १० तोफा , १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले

भुदरगड किल्ल्याचा इतिहास

भुदरगड भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदीचा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड   झाली आहे. इथे दरवर्षी माघ कृष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. इतिहास इ.स. १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक हल्ला करून तो जिंकून तर घेतलाच , पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकत्री ती अजूनही देवळात आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तराधात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण

पन्हाळा किल्ल्याचा इतिहास

पन्हाळा तीन दरवाजा येथील आतील दवार , इ.स.१८९४ , पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णात्रदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी , इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. भौगोलिक स्थान आधुनिकद्ष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे. इतिहास पन्हाळ्याला साधारण १ , २०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव

विशाळगड किल्ल्याचा इतिहास

  विशाळगड विशाळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस 76 कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. इतिहास विशाळगडाची उभारणी इ.स. 1058 मध्ये शिलाहार राजा मारसिंह याने केली. हा गड किल्ले खेळणा या नावाने देखील ओळखला जातो. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मत्रीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारना सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक् त केला. यासैन्यातील एक सरदार मत्लीक शैहान होत