मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवगिरी-दौलताबाद किल्याचा इतिहास

देवगिरी-दौलताबाद ' देवगिरी ' हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन दौलताबाद हा ऐतिहासिक किल्ला आहे. बदामिचे चालुक्य , कल्याणचे चालुक्य , मोर्य , सुंगा , सातवाहन , हल(हाला) , शकक्षत्रप , सतकर्णी , वाकाटक , नल , विंध्यसेना , प्रवरसेना , राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता.कृष्णा नदीच्या उत्तरेकडे आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लमा ह्या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले. पुढे सिंघाना आणि त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याच्या अचूक तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश् चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यशप्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपिवली . पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वत:कडे घेतली   आणि त्यासोबत विदर्भ व इतरत्रही विजय प्