मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोथळीगड किल्ल्याचा इतिहास

  कोथळीगड कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या साळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ' पेठचा किल्ला ' असेही म्हणतात. हा किल्ला ' कोथळा ' या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व  सावळ घाटावर तक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा.माथेरानचे पठार , चंदेरी , प्रबळगड , नागफणी , सिधगड , माणिकगड , पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो. पेठ गावातून पाउलवाटेने वर चढत गेल्यावर थेट

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

  कुलाबा किल्ला किल्ल्याचा प्रकार : जल्रदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गदूवयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग हया प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो ; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूडइकोट बनतो.हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे , त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश् चिम रुंदी १०९ मीटर आहे. इतिहास : अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. “ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र“ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा  किल्ला केंद्र होता. ४ जु