मुख्य सामग्रीवर वगळा

कोथळीगड किल्ल्याचा इतिहास

 कोथळीगड

कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या साळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत. पेठ गावाच्या निकटतेमुळे याला 'पेठचा किल्ला' असेही म्हणतात. हा किल्ला 'कोथळा' या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर तक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा.माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो.

पेठ गावातून पाउलवाटेने वर चढत गेल्यावर थेट कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा सामोर्याव येतात. प्रथम लागते ती देवीची गुहा व पाण्याचे टाके व नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा. या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एक उर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत. कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथुन साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते. रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळे मार्गे जाणारी आंबिवले  बस घ्यावी. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागेल. तीन किलोमीटरवर पेठ गाव. हा कोठळीगड किल्ल्याचा पायथा. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचावे. खाली तळात काही पंचरशी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.

इतिहास

शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता. गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात  माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर त्याच्या सैन्याला, हे आपल्रेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले. हा किल्ला जिंकल्याबद्दय औरंगजेबाने अब्दूल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला जिंकुन घेण्याचा अयशस्वी प्रयास केला;ज्यात तो  आणि त्याचे सैन्य मारले गेले.

खालील दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले यांनाही अवश्य भेट द्या आणि आपल्या किल्ल्या बद्दल अजून माहिती जाणून घ्या 

गवळीगड(गाविलगड) किल्ला (अमरावती)

भुईकोट किल्ला (अहमदनगर)

बहादुरगड (धर्मवीरगड) अहमदनगरचा

रतनगड किल्ला (अहमदनगर)

नळदुर्ग किल्ला (अहमदनगर)

परंडा किल्ला (उस्मानाबाद )

देवगिरी-दौलताबाद किल्ला (औरंगाबाद )

अवचितगड किल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

  कुलाबा किल्ला किल्ल्याचा प्रकार : जल्रदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गदूवयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग हया प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो ; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूडइकोट बनतो.हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे , त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश् चिम रुंदी १०९ मीटर आहे. इतिहास : अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. “ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र“ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा  किल्ला केंद्र होता. ४ जु

खांदेरी किल्याचा इतिहास

  खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भोगोलिक स्थान खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे ; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भैंडार् याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे. थळच्या किनार पट्टीवर थळचा भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जल्दुर्गावर जाता येते. इतिहास मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस् ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन वित्रियम मिंचिन , रिचर्ड केग्वीन , जॉन ब्रँडबरी , फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी

गंभीरगड किल्ल्याचा इतिहास

गंभीरगड गंभीरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर , दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेग गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे. कसे जाल ? गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक् ्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक् याचे पूर्व आणि पश् चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी.उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा- सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार