मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घोसाळगड उर्फ वीरगड किल्ल्याचा इतिहास

घोसाळगड उर्फ वीरगड घोसाळगड उर्फ वीरगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधे आहे. दुर्गसंपन्न असलेल्या कोकणातील रायगड जिल्ह्यामधे रोहे तालुका आहे. रोहे तालुक्यात घोसाळगडाचा किल्ला आहे. मुंबई-पुणे या महानगरांशी रोहे हे गाडीमार्गाने जोडले गेत्रे आहे. शिवकालापासून प्रसिद्ध असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. रोहे येथून मुरुड या सागरकिनाऱ्यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.त्यापैकी एक चणेरे - बिरवाडी कडून कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने जातो. तसेच दुसरा मार्ग घोसाळगडाकडून भालगाव मार्गे जातो. याच मार्गावर घोसाळगडाचा किल्ला आहे. चारही बाजुंना लहान मोठय़ा डोंगरांच्या मधे घोसाळगड विराजमान झालेला आहे. समुद्र सपाटीपासून २६० मीटर उंच असलेल्या घोसाळगडाचा आकार दूरुन शिवलिंगासारखा भासतो. इतिहास शिवकालामधे स्वराज्यात असलेला घोसाळगड पुर्वी निजामशाही मधे होता. छत्रपती   शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिर् याच्या सिद्धीने घोसाळगडाला वेढा दिला होता पण अफझलखान मारला गेल्याचे कळाल्यावर सिद्धी वेढा उठवून पळून गेला. पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसाळगड मोग