मुख्य सामग्रीवर वगळा

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

 कुलाबा किल्ला

किल्ल्याचा प्रकार : जल्रदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही

जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गदूवयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग हया प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूडइकोट बनतो.हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश् चिम रुंदी १०९ मीटर आहे.

इतिहास :

अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. “ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र“ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर् या आगीत आंग्ग्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक् त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

भूगोल :

पहाण्याची ठिकाणे :

किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार् याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो.हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशीशिल्पे कोरलेली आहेत.दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश् चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला 3 व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत.बुरुजांना पिंजरा, नगारखानीगणेश,सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत.प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्ग्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे हयांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो.मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पत्निकडच्या दरवाजातून बाहेर गेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर् या आहेत.दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार् या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे,वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे. दरवाजालगत कान्होजींची घुमटी व दवाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस् त कलली जात असत.किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर् या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार् या कंपनीच नाव कोरल्ेल आहे “ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.

पोहोचण्याच्या वाटा :

मुंबईहून - पनवेल - वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार् यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.

राहाण्याची सोय :

गडावर राहण्याची सोय नाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.

जेवणाची सोय :

गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय अलिबाग मध्ये आहे.

पाण्याची सोय :

गडावर पाण्याची सोय नाही , पाण्याची सोय अलिबाग मध्ये आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :

सूचना :

किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा खात्रीलप्रमाणे आहेत.

तिथी वेळ तिथी वेळ

प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:००

दवितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३०

तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:००

चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:००

पंचमी ७:०० ते ९:३० दुवादशी १२:०० ते १५:००

षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:००

सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:००

पोर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:००

खालील दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले यांनाही अवश्य भेट द्या आणि आपल्या किल्ल्या बद्दल अजून माहिती जाणून घ्या 

गवळीगड(गाविलगड) किल्ला (अमरावती)

भुईकोट किल्ला (अहमदनगर)

बहादुरगड (धर्मवीरगड) अहमदनगरचा

रतनगड किल्ला (अहमदनगर)

नळदुर्ग किल्ला (अहमदनगर)

परंडा किल्ला (उस्मानाबाद )

देवगिरी-दौलताबाद किल्ला (औरंगाबाद )

अवचितगड किल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कुलाबा किल्ल्याचा इतिहास


 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खांदेरी किल्याचा इतिहास

  खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भोगोलिक स्थान खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे ; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भैंडार् याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे. थळच्या किनार पट्टीवर थळचा भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जल्दुर्गावर जाता येते. इतिहास मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस् ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन वित्रियम मिंचिन , रिचर्ड केग्वीन , जॉन ब्रँडबरी , फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी

गंभीरगड किल्ल्याचा इतिहास

गंभीरगड गंभीरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर , दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेग गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे. कसे जाल ? गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक् ्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक् याचे पूर्व आणि पश् चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी.उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा- सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार