मुख्य सामग्रीवर वगळा

खांदेरी किल्याचा इतिहास

 खांदेरी किल्ला

खांदेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

भोगोलिक स्थान

खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भैंडार् याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे. थळच्या किनार पट्टीवर थळचा भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जल्दुर्गावर जाता येते.

इतिहास

मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस् ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन वित्रियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी पाठवल्या होत्या. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. मायनाक भैंडार् याच्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग-थळच्या किनाऱ्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. मराठ्यांच्या होड्या थळच्या किनाऱ्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते; पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही. वार् यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता डव् ह नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना कैद करून सागरगडावर डांबले. या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल्र-उथळ पाणी, मतलय वारे, इत्यादींचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली. मराठे रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत बेटावर सामान पोहचते करीत. इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार् यावर अवलंबून असत. खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरित्या चकवले.

खालील दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले यांनाही अवश्य भेट द्या आणि आपल्या किल्ल्या बद्दल अजून माहिती जाणून घ्या 

गवळीगड(गाविलगड) किल्ला (अमरावती)

भुईकोट किल्ला (अहमदनगर)

बहादुरगड (धर्मवीरगड) अहमदनगरचा

रतनगड किल्ला (अहमदनगर)

नळदुर्ग किल्ला (अहमदनगर)

परंडा किल्ला (उस्मानाबाद )

देवगिरी-दौलताबाद किल्ला (औरंगाबाद )

अवचितगड किल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

कोथळीगड किल्ल्याचा इतिहास

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

  कुलाबा किल्ला किल्ल्याचा प्रकार : जल्रदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गदूवयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग हया प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो ; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूडइकोट बनतो.हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे , त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश् चिम रुंदी १०९ मीटर आहे. इतिहास : अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. “ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र“ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा  किल्ला केंद्र होता. ४ जु

गंभीरगड किल्ल्याचा इतिहास

गंभीरगड गंभीरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर , दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेग गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे. कसे जाल ? गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक् ्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक् याचे पूर्व आणि पश् चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी.उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा- सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार