मुख्य सामग्रीवर वगळा

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ला

कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला होता आणि नंतर तो पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि परत इ.स. १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यामध्ये आणला.


किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे  हा किल्ला बाकीच्या किल्ल्यापासून वेगळा वाटतो.किल्ल्याचा माथा हा फारच लहान आहे.पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला खुपच  प्रसिद्ध आहे.पण किल्ल्याच्या तटबंदी ह्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. कर्नाळा गडावर भवानी मातेचे मंदिर आहे आणि भवानी मंदिराच्या जवळच एक वाद आहे आणि सध्या तो ढासळलेल्या अवस्थेत  आहे.  गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची एक टाकी आणि धान्य कोठारेच साठे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.

गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था.

«» राहण्यासाठी खोल्या :

किल्ल्याच्या पायथाल्या असलेल्या शासकीय विश्रामगृहामध्ये  रहाण्याची सोय उपलब्ध आहे.

«» कसे जावे :

मुंबई-गोवा महामार्गाने जाताना पनवेल नंतर शिरढोण गाव लागते. गावाच्या जवळच कर्नाळा किल्ल्याचा परिसर आहे.


«» जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

किल्ल्याचा माथा फारच तहान आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार ढासळलेल्या अवस्थेत आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एक  वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य साठवण्याची जागा आहेत. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे हे अत्यंत आवश्यक आहे. सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक असणारे साहित्य सुद्धा हवे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येता येईल. गड फिरण्यास साधारण ३० मिनिटे पुरतात.

या किल्ल्याची उंची आहे सुमारे ४५० मीटर असल्यामुळे हा गडावर चढणे फारसे अवघड काम नाही . किल्ल्याच्या पश् चिमेकडून जाणाऱ्या वाटेने थोडे चढल्यावर एक खडक लागतो. खडक चढून गेल्यावर एक दरवाजा लागतो. आत शिरल्यावर इमारतीच्या पडत आलेल्या भिंती व त्यांचा सुळका दिसुन येतो. या सुळक्यात  १२-१३ व्या शतकामध्ये खोदलेली चार दान्य कोठारे तसेच पाण्याच्या टाक्या आहेत. 



या ठिकाणी पारसी व मराठी शिलालेखही आढळतात यातल्या एका पारसी शिलालेखात 'सय्यद नुरुद्दीन मुहम्मदखान, हिजरी ११४७ असे लिहिले आहे तर मराठी शिला लेखात 'शके १५९२ संवस्तर आषाढ शु.१४ कर्नाळा घेतला' असे लिहिले आहे.

माथ्यावर असलेला ५० मिटर उंचीचा सुळका प्रथम दर्शनीच छातीमध्ये धडकी भरवितो. परंतू हा सुळका गिर्यारोहकांचा लाडका आहे. पश् चिमेच कलत्या असलेल्या या सुळक्यावर मधमाशांचे पोळे आहेत आणि या पोळ्यातल्या मधासाठी परिसरातील ठाकरांनी काही पायऱ्या खोदल्या आहेत परंतू सामान्य पर्यटकाला त्यावर चढता येणे कठीण आहे. या किल्ल्यावरुन पश् चिमेकडे मुंबई, घारापुरी बेट, माणिकगड, सह्याद्री रांगेत नागफणी, राजमाची व माथेरान दिसून येते. 

गडावर पुर्वी देवगिरीचे यादव राज्य करित असत. सन १५४० मध्ये हा किल्ला अहमदनगरच्या ताब्यात गेला होता ,नंतर गुजरातच्या  सुलतानने पोर्तुगिजांची मदत घेऊन हा किल्ला ताब्यात घेतला आणि कालांतराने शिवाजी महाराजांनी किल्ला त्यांच्या राज्यात आणला. 

कर्नाळा किल्ला परिसरात दाट जंगल असून येथे विविध प्रकारचे पक्षी दिसून येतात म्हणुन शासनाने येथे २ ऑक्टोबर १९६९ साली ४.५० चौ.कि.मी.क्षेत्रात पक्षी अभयारण्याची निर्मिती केली . या अभयारण्यात १५० जातींचे विविध पक्षी आढळतात.आणि ४० जातिंचे विविध पक्षी स्थालांतर करुन विविध हंगामात इकडे येतात. निरिक्षण केल्यास आपल्याआ खंड्या, ससाणा, हिरवा तांबट, मोर,पंचरंगी पोपट, कालशिर्ष कांचन, हिरवा तांबट इत्यादी तसेच इतर अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन घडू शकते. येथे पक्षांसाठी  ११ पक्षीघरे असून स्थानिक नसलेले दुर्मिळ पक्षी या ठिकाणि पहावयास मिळतात. 

पक्षीनिरिक्षणाचा छंद सध्या बराच लोकप्रिय होत चालला आहे. गळ्यात दुर्बिण अडकावून दाट जंगलात पक्ष्यांचा मागोवा घेत भटकणे, दिसलेल्या सुंदर पक्ष्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात बंदिस्त करणे, दुरवर असलेल्या गोड पक्ष्याच्या गोड गाण्यात आपत्रिही एखादी तान मिसळवणे, परिसरात पडलेली पक्ष्यांची रंगिबेरंगी पिसे जमवणे यातली मजा काही औरच आहे. म्हणतात ना 'हा छंद जिवाला लावी पिसे!' परंतु हे सर्व त्या बिचाऱ्यांना त्रास न देताच करा.

खालील दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले यांनाही अवश्य भेट द्या आणि आपल्या किल्ल्या बद्दल अजून माहिती जाणून घ्या 

गवळीगड(गाविलगड) किल्ला (अमरावती)

भुईकोट किल्ला (अहमदनगर)

बहादुरगड (धर्मवीरगड) अहमदनगरचा

रतनगड किल्ला (अहमदनगर)

नळदुर्ग किल्ला (अहमदनगर)

परंडा किल्ला (उस्मानाबाद )

देवगिरी-दौलताबाद किल्ला (औरंगाबाद )

अवचितगड किल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

  कुलाबा किल्ला किल्ल्याचा प्रकार : जल्रदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गदूवयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग हया प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो ; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूडइकोट बनतो.हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे , त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश् चिम रुंदी १०९ मीटर आहे. इतिहास : अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. “ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र“ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा  किल्ला केंद्र होता. ४ जु

खांदेरी किल्याचा इतिहास

  खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भोगोलिक स्थान खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे ; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भैंडार् याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे. थळच्या किनार पट्टीवर थळचा भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जल्दुर्गावर जाता येते. इतिहास मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस् ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन वित्रियम मिंचिन , रिचर्ड केग्वीन , जॉन ब्रँडबरी , फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी

गंभीरगड किल्ल्याचा इतिहास

गंभीरगड गंभीरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर , दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेग गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे. कसे जाल ? गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक् ्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक् याचे पूर्व आणि पश् चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी.उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा- सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार