मुख्य सामग्रीवर वगळा

पेब (विकटगड) किल्ल्याचा इतिहास

पेब (विकटगड)

पेब (विकटगड) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पनवेत्रच्या ईशान्येला मुंबई-पुणे मार्गावरील नेरळपासून पश् चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला चढताना लागणारे जंगत्र घनदाट आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे.
इतिहास
या किल्ल्याचे नाव पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडल्रे असावे. किल्ल्यावरील गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होताअसा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.
जाण्याच्या वाटा
मध्य रेल्वेने कर्जतजवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेबच्या किल्ल्याचे दर्शन होते. नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला व उजवीकडची वाट पेबला जाते. डोंगराच्या दिशेने जाताना मैदानपोल्ट्रीफार्म व घरांची अर्धवट बांधकामे दिसतात. त्यानंतर समोर दिसणार् या इलेक्ट्रिकच्या मोठमोठ्या टॉवरच्या दिशेने गेल्यावर सिमेंटचा एक मोठा पाया असलेला टॉवर येतो. तेथून थोडे पुढे गेल्यावर एक मोठा धबधबा लागतो. या धबधब्याजवळच तीन वाटा आहेत. 

1) धबधब्याला लागून असलेली वाट. 

२) मधून गेलेली मुख्य वाट. 

३) टॉवर्सला लागून असलेली वाट 

या तीन वाटांपैकी पहिल्या वाटेने पुढे गेल्यास जंगल लागते. पण पुढे या वाटेने जाणे अशक्यच आहे. तिसरी वाट म्हणजे मानेला वळसा घालून घास घेण्यासारखा प्रकार होय. तसेच या वाटेला पनवेलकडे जाणारे फाटे फुटत असल्याने वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे. मधल्री मुख्य वाट हीच किल्ल्याच्या गुहेपर्यंत नेणारी खरी वाट आहे.. या वाटेने गणपतीचे चित्र काढलेला दगड येतो. या दगडाच्या उजव्या बाजूने वर चढल्यावर पुढे झर् यातून जावे लागते. तरीही वाट न सोडता याच वाटेने खिंडीच्या दिशेने वाटचाल करून खिंडीत पोहोचल्यावर तेथून डाव्या हाताला वळून पुढे जावे लागते. तेथून पुढे पांढरा दगड लागतो. पांढरा दगड चढण्यास अतिशय कठीण असून तो पार केल्यानंतर मात्र पुढे थोड्याच अंतरावर गुहा लागते. प्रथमच जाणार् यांनी वाटाडया घेणे हितकारक आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

नेरळ रेल्वे स्टेशनपासून ३तास.किल्ला चढण्यास लागणारा वेळ दोन ते अडीच तास आहे. पेबवर जाण्यासाठी गिर्यारोहकांना आणखी एक वाट आहे. त्यासाठी माथेरानच्या पॅनोरमा पॉईंटवर यावे. येथून सुमारे ६ तासात पेबच्या गुहेत पोहचता येते. गुहेच्या पायथ्याशी गरुड कोरला आहे.

गडावरीत्र पहाण्यासारखी ठिकाणे

पेबचा किल्ला चढताना वाटेत लागणारा धबधबा हे एक मोठे आकर्षण आहे. किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून आपल्याला नवरा-नवरीभटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही क्रतूत जाता येते.

राहण्याची/पाण्याची सोय

किल्ल्यावर गुहेमध्ये स्वामी समर्थांचे शिष्यगण रहात असल्याने गुहेच्या बाहेर किंवा जवळच असलेल्या कपारीमध्ये १० जणांच्या रहाण्याची सोय होते. गुहेजवळच असलेले पाण्याचे टाके हीच पिण्याच्या पाण्याची सोय. जेवणाची सोय स्वतःच करावी लागते.

खालील दिलेल्या महाराष्ट्रातील किल्ले यांनाही अवश्य भेट द्या आणि आपल्या किल्ल्या बद्दल अजून माहिती जाणून घ्या 

गवळीगड(गाविलगड) किल्ला (अमरावती)

भुईकोट किल्ला (अहमदनगर)

बहादुरगड (धर्मवीरगड) अहमदनगरचा

रतनगड किल्ला (अहमदनगर)

नळदुर्ग किल्ला (अहमदनगर)

परंडा किल्ला (उस्मानाबाद )

देवगिरी-दौलताबाद किल्ला (औरंगाबाद )

अवचितगड किल्याचा इतिहास

कर्नाळा किल्ल्याचा इतिहास

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

कोथळीगड किल्ल्याचा इतिहास

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुलाबा किल्ल्याचा इतिहास

  कुलाबा किल्ला किल्ल्याचा प्रकार : जल्रदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : रायगड श्रेणी : सोपी अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गदूवयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग हया प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो ; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूडइकोट बनतो.हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे , त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश् चिम रुंदी १०९ मीटर आहे. इतिहास : अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती. “ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र“ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा  किल्ला केंद्र होता. ४ जु

खांदेरी किल्याचा इतिहास

  खांदेरी किल्ला खांदेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भोगोलिक स्थान खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नव्हे ; पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे. इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भैंडार् याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला. या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे. त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाहीत. बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे. खांदेरी किल्ल्यास भेट देण्यासाठी प्रथम अलिबागला जावे लागते. तेथून थळला जावे. थळच्या किनार पट्टीवर थळचा भग्न किल्ला आहे. तेथून नावेतून या जल्दुर्गावर जाता येते. इतिहास मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना ईस् ट इंडिया कंपनीच्या मुंबईतील वखारकरांती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. कॅप्टन वित्रियम मिंचिन , रिचर्ड केग्वीन , जॉन ब्रँडबरी , फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रीगेटी त्यांनी

गंभीरगड किल्ल्याचा इतिहास

गंभीरगड गंभीरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ठाणे जिल्हा कोकणामधील सर्वात उत्तरेकडील जिल्हा आहे. निसर्गाची विविध रुपे अंगाखांद्यावर मिरविणारा ठाणे जिल्हा सागराचा दंतूर किनारा आणि घनदाट जंगलांनी वेढलेले डोंगर , दऱ्याखोरी यांनी समृद्ध आहे. या दुर्गम डोंगररांगामध्ये अनेग गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच गिरीदुर्गामध्ये गंभीरगड नावाचा वनदुर्ग मोठय़ा दिमाखात उभा आहे. कसे जाल ? गंभीरगड ठाणे जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यामध्ये आहे. मुंबई अमदावाद हा राष्ट्रीय महामार्ग डहाणू तालुक् ्यामधून जातो. त्यामुळे डहाणू तालुक् याचे पूर्व आणि पश् चिम भाग झाले आहेत. डहाणूच्या पूर्व भागात गंभीरगडाचा गिरीदुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून ६८६ मी.उंचीच्या गंभीरगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील तलासरी या तालुक्याच्या गावाकडून उधवामार्गे गंभीरगडाचा पायथा गाठता येतो. तसेच महामार्गावरील चारोटीनाका-कासा- सायवानमार्गे येवून गडूचा पाडा या छोटय़ाशा वस्तीजवळून आपण व्याहाळी या गंभीरगडाच्या पायथ्याला पोहोचू शकतो. गंभीरगडावर जाण्यासाठी व्याहाळी मधून जाणारा मार्ग धोपटमार